उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Maharashtra Land Revenue Fraud: महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, की पुणे विभागातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता संपूर्ण राज्यात मागील पाच वर्षांत ‘कलम- १५५’ अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Assembly Crackdown

Assembly Crackdown

esakal

Updated on

मुंबईः महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम-१५५’ चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा कामे आणि जमिनींचे फेरफार करणाऱ्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह पंधरा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेमध्ये केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com