- राधिका वळसे पाटील
पुणे - प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) १२४ छात्रांची निवड करण्यात आली आहे. यात ८० विद्यार्थी आणि ४४ विद्यार्थीनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ५२ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यातील २१ छात्रांची राजपथावरील संचलनासाठी निवड झाली आहे.