Arunoday' Special Campaign: Mission to Make Maharashtra Sickle Cell-Free
sakal
पुणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५ लाखांहून अधिक नागरिकांच्या रक्ताच्या तपासण्या आरोग्य विभागाने केल्या असता त्याद्वारे १२ हजार ४२० जणांना ‘सिकलसेल’ या आनुवंशिक रक्तविकाराचे निदान झाले आहे. त्याचबरोबर १ लाख २४ हजार २७५ लोकसंख्या वाहक (रुग्ण नाही) असून त्यांच्यापासून पुढे वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी ‘अरुणोदय’ विशेष मोहीम आखली आहे.