CM Eknath Shinde: 'मविआ' नेत्यांची सुरक्षा कपात तर सहा मंत्र्यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Devendra Fadnavis

CM Eknath Shinde: 'मविआ' नेत्यांची सुरक्षा कपात तर सहा मंत्र्यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा

मुंबईः राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेतमध्ये वाढ करण्यात आलीय. या मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली. महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा सरकारने नुकतीच काढून घेतली होती.

सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरविण्यत आलेली आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

दरम्यान, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मविआच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबीय, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील आदी २७ जणांना समावेश आहे.