राज्यात आजपर्यंत २८,०८१ रुग्ण बरे झाले, तर एवढे अजून ॲक्‍टिव्ह रुग्ण; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई - आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे ८१, मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे - ६, रायगड- ३ , नवी मुंबई -२, कल्याण-डोंबवली २, नाशिक ३ , जळगाव ३, पुणे मनपा १२, पुणे ६, सोलापूर ६, नागपूर १, नागपूर १, इतर राज्यांतील २ मृत्यू असून राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state coronavirus patient increase