खादी व ग्रामोद्योग महामंडळात 119 जागांसाठी भरती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठीच्या 119 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठीच्या 119 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतची अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव :

1. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (व्हिलेश इंडस्टीज) – 3 पदे
2. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (एचआर) – 1 पद
3. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (एफबीएए) – 3 पदे
4. सिनिअर एक्झिक्युटिव्ह (इकॉनॉमी रिसर्च) – 9 पदे
5. एक्झिक्युटिव्ह (व्हिलेज इंडस्ट्रीज) – 41 पदे
6. एक्झिक्युटिव्ह (खादी) – 8 पदे
7. एक्झिक्युटिव्ह (ट्रेनिंग) – 4 पदे
8. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एफबीएए) – 16 पदे
9. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – 21 पदे
10. असिस्टंट (व्हिलेज इंडस्ट्रीज) – 11 पदे
11. असिस्टंट (खादी) – 1 पद
12. असिस्टंट (ट्रेनिंग) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : बी.ई/बी.टेक किंवा एम.एस किंवा एमबीए आणि 5 वर्षांचा अनुभव
पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव
पद क्र.3 : सीए/एमबीए (वित्त) / एम.कॉम आणि 3 वर्षांचा अनुभव
पद क्र.4 : पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र/सांख्यिकीशास्त्र/ वाणिज्य) 
पद क्र.5 : बी.ई/बी.टेक किंवा एम.एस्सी किंवा एमबीए 
पद क्र.6 : बी.ई/बी.टेक (वस्त्रोद्योग अभियंता/वस्त्रोद्योग तंत्रज्ञान/फॅशन टेक्नॉलॉजी)
पद क्र.7 : बी.ई/बी.टेक किंवा एम.एस्सी किंवा एमबीए 
पद क्र.8 : बी.कॉम
पद क्र.9 : पदव्युत्तर पदवी किंवा 3 वर्षे अनुभवासह पदवीधर 
पद क्र.10 : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.
पद क्र.11 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (वस्त्रोद्योग अभियंता/वस्त्रोद्योग तंत्रज्ञान/फॅशन टेक्नॉलॉजी/हातमाग तंत्रज्ञान)
पद क्र.12 : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.

वयोमर्यादा : 31 जुलै 2019 रोजी, पद क्र. 1, 2 आणि 3 : 40 वर्षांपर्यंत, पद क्र. 4 : 35 वर्षांपर्यंत 
पद क्र. 5 ते पद क्र. 12 : 32 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळास भेट द्या : - http://bit.ly/2XtakSV

आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 
http://bit.ly/2Xsj4gZ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Khadi and Village Industries Board Recruitment for 119 seats