
राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; विदर्भात तापमान चाळीशी पार
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मिश्र वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान राज्यात मागच्या सात दिवसांपासून काही जिल्ह्यात पावसाच्या सरी पडत आहेत.
(Rain Updates)
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच वर्धा आणि चंद्रपूरमध्ये या जिल्हांपेक्षा कमी पण समाधानकारक पाऊस पडला आहे. तसेच यवतमाळ आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाच्या थोड्या प्रमाणावर सरी कोसळल्या असून रत्नागिरी, सातारा, लातूर आणि नागपूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
हेही वाचा: अण्णा हजारे देखील विलासराव देशमुखांना विचारून उपोषणाला बसायचे
पुणे, मुंबई, पालघर, आहमदनगर, परभणी, नांदेड, रायगड आणि गोंदिया या जिल्हातील तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यात पाऊसाच्या सरी कोसळल्या नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वर आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून अजून मान्सूनचे आगमन झाले नाही. त्याचबरोबर काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
Web Title: Maharashtra State Pre Monsoon Rain And Temperature Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..