esakal | राज्याला मिळणार १७ लाख ४१ हजार 'रेमडेसिविर'चा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir Injectionin

राज्याला मिळणार १७ लाख ४१ हजार 'रेमडेसिविर'चा साठा

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात सगळीकडे तुटवडा आहे. पण आता हा तुटवडा येत्या सात दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. हाफकीन संस्थेकडुन ऑर्डर देण्याची हमी दिली असुन तसे पत्र त्यानी गुरुवारी (ता.२९) जारी केले आहे. जवळपास १७ लाख ४१ हजार एवढा साठा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात हा साठा उपलब्ध झाला, तर नक्कीच इंजेक्शन तुटवडा दुर होऊन त्याचा काळाबाजार देखील थांबेल अशी अपेक्षा आहे. रेमडेसिविर हा कोरोनावरील अंतिम उपाय नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले असले तरीही त्याची मागणी काही कमी होत नाही. या इंजेक्शनच्या बाबतीत मोठा गैरसमज पसरला असल्याने सहजासहजी सरकारला हे थांबविता येणे शक्य नाही. इंजेक्शन दिल्याने रुग्णांच्या स्थितीत फरक पडत असल्याची मानसिकता झाल्याने त्याची मागणी मोठी वाढली आहे.

हेही वाचा: सांगा! तहान भागणार कशी?औरंगाबादेत दररोज दीडशे एमएलडी पाण्याची तूट

राज्यात सगळीकडे ते वापरले जात आहे. देशामध्ये पाच ते सहा कंपन्या हे औषध तयार करतात. त्याची मागणी वाढल्यानंतर राज्य सरकारची खरेदी हाफकिन संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. ही खरेदी झाल्यानंतर त्याचा पुरवठा विभागावर केला जाणार आहे. त्याचे वितरण विभागानी जिल्हावार करावयाचे आहे. रुग्णांच्या संख्येवरुन हा साठा वितरीत करण्याचा कोटा देखील ठरवुन दिलेला आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्याला साठा अधिक मिळणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासुन कित्येक रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता असतानाही त्याचा तुटवडा असल्याने ते देता आले नाही. काही ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाल्याचे दिसुन येत आहे. सरकारने इंजेक्शनचा बफर स्टॉक करुन ठेवण्याचाही विचार केल्याचे दिसुन येत आहे. हाफकिन संस्थेने ऑर्डरच्या पत्रामध्ये बफर स्टॉकचाही आकडा दिला आहे. त्यावरुन तिसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देण्यासाठी सरकार आतापासुन कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका सुधारण्यासाठी सरकार अधिक काळजी घेताना दिसत आहे. दिलेल्या वेळेत हाफकीनकडुन ऑर्डर दिल्या गेल्या तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे. येत्या सात दिवसांमध्ये डिलिव्हरी तारीख त्यानी दिलेली आहे. त्यामुळे पुढील सात ते दहा दिवसामध्ये जरी हा साठा प्राप्त झाला तरी मोठी अडचण दुर होण्यास मदत होणार आहे.

loading image