राज्यात 45.77 लाख टन साखर उत्पादन

चालू गळीत हंगामात राज्यातील 189 साखर कारखान्यात 31 डिसेंबरअखेर 45.77 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
sugar
sugarsugar

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात राज्यातील 189 साखर कारखान्यात 31 डिसेंबरअखेर 45.77 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते 5.91 लाख टनांनी अधिक आहे.महाराष्ट्राने यावर्षी गाळप हंगामाच्या प्रारंभीपासूनच साखर उत्पादनात आघाडी कायम ठेवली असून उत्तरप्रदेशच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत दीडपट साखर उत्पादन जास्त झाले आहे.देशाच्या यंदाच्या आतापर्यंतच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के इतका आहे.

देशात 492 साखर कारखान्यात 31 डिसेंबरपर्यंत 115.55 लाख टन साखर तयार झाली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात आतापर्यंत 4.81 लाख टन साखरेचे उत्पादन अधिक झाले आहे.इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.उत्तरप्रदेशात गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 2.76 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे.कर्नाटकात मागील वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात 1.49,गुजरातमध्ये 0.15,आंध्रप्रदेश व तेलंगणात 0.11 लाख टन तर तामिळनाडूत 19 हजार टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.बिहारमध्ये यावर्षी 1.94,हरियाणा व पंजाबमध्ये प्रत्येकी 1.40,उत्तराखंडमध्ये 1.23 तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 1.40 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

sugar
'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

जानेवारीअखेरीस 'इस्मा'चा दुसरा सुधारित अंदाज-

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 'इस्मा'तर्फे देशातील शिल्लक ऊसक्षेत्राची उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेतली जाणार आहेत.त्याआधारे गाळपाचा शिल्लक राहिलेला ऊस,साखर उताऱ्याची स्थिती,ऊसाच्या एकरी उत्पादनाची टक्केवारी यावरून इस्माच्यावतीने जानेवारीअखेरीस साखर उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे.चालू हंगामात देशात नोव्हेंबरपर्यंत 47.50 लाख टन साखरेची विक्री झाली आहे.गतवर्षी या कालावधीपर्यंत 45.61 लाख टन साखर विक्री झाली होती

प्रमुख राज्यातील 31 डिसेंबरअखेरची साखर उत्पादनाची स्थिती (लाख टनामध्ये)-

राज्य कारखाने सुरू साखर उत्पादन

  • महाराष्ट्र 189 45.77

  • उत्तरप्रदेश 119 30.90

  • कर्नाटक 69 25.65

  • गुजरात 15 3.5

  • आंध्र व तेलंगणा 12 1.05

  • तामिळनाडू 15 0.92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com