esakal | मोठी बातमी! सात ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडणार | maharashtra temple reopening thackeray government religious places mosque church
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी! सात ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडणार

मोठी बातमी! सात ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मंदिरे उघडण्यासंदर्भातील एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे. राज्यातील मंदिरे सात ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आलेली आहेत. लॉकडाऊन हटवला असून संसर्गाची परिस्थितीही हातात असल्यामुळे आता मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. (Maharashtra temple reopening)

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

मगाशीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु करणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानंतर लगेचच आता राज्यातील मंदिरे देखील उघडण्याचा ठाकरे सरकारचा हा निर्णय समोर येत आहे.

loading image
go to top