Live : नवरात्रीनिमित्त मंदिरात सजावट, भाविकांनी घेतले दर्शन

Live : नवरात्रीनिमित्त मंदिरात सजावट, भाविकांनी घेतले दर्शन

Temples in Maharashtra to reopen on October 7 Live update : कोरोनामुळे बंद झालेली धार्मिक स्थळे आजपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून (७ ऑक्टोबर) राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली होणार आहेत. मुंबई, पुणे, पंढरपूर, कोल्हापूर आणि तुळजापूरसह सर्व ठिकाणावर भक्तीमय वातावरण आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारने धार्मिक स्थळ बंद केली होती. रुग्णांची संख्या कमी होत असताना मंदिरे खुले करावीत यासाठी राज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन केले होते. आजपासून राज्यभरातील मंदिराची दारं खुली होत आहेत.... राज्यात आज असणाऱ्या भक्तीमय वातावरणाचं लाईव्ह अपडेट पाहूयात....

नाशिक : काळाराम मंदिर व कपालेश्वर मंदिरात दर्शन; भाविकांची लगबग

राज्यभरातील मंदिरे सुरु करण्यात आल्यानंतर मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी लगबग आहे. नाशिक शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर येथे पर्यटक भाविकांची असलेली लगबग.

  • माहूरगडावरील नवरात्रोत्सवाला सुरुवात

    माहूर (जि. नांदेड) ः साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या नवरात्र उत्सवाला गुरुवारी (ता.सात आॅक्टोबर) सुरुवात झाली. भाविकांनी कोरोनाची नियमावलींचे पालन करून दर्शन घ्यावे. यंदा कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. दर्शनासाठी भाविकांनी मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन पास उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केले आहे.

  • दीड वर्षानंतर माउलीच्या दर्शनाने धन्य झालेल्या भाविकांच्या डोळ्यात 'आनंदाश्रू'

    गोंदवले (सातारा) : दीड वर्षानंतर प्रत्यक्ष माउलीच्या दर्शनाने धन्य झालेल्या भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आज गोंदवल्यातील समाधी मंदिर उघडल्याने श्रींच्या ओढीची आस पूर्ण झाली. शिस्तीचे पालन करत भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे देखील गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर आज घटस्थापनेदिवशी बंद मंदिरांचीद्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर देखील आज भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव आता थंडावला असला तरी समाधी मंदिर समितीने भाविकांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत भाविकांना दर्शन दिले जात आहे

  • केंद्राकडे बोट न दाखवता राज्य सरकारने सरसकट मदत करावी

माहूर (जि.नांदेड) ः राज्यात मदिरे सुरु झाली होती. परंतु, मंदिरे मात्र बंदच होती. नवरात्रोत्सवामुळे का होईना राज्य शासनाला सुबुद्धी आली आणि त्यांनी मंदिरे आजपासून खुली केलीत, याचा निश्चितच आनंद होत आहे. कोरोनाचे संकट कायमस्वरूपी संपुष्टात आणून राज्य सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माहुरगडावर केली. तसेच शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. परंतु, राज्य सरकार मदतीसाठी वेळकाढूपणा करत आहेत. केंद्राकडे फक्त बोट दाखविण्याचे काम सुरु आहे. कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मदत राज्यसरकारने करण्याची आवश्यकता आहे.

  • औरंगाबादेतील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर, भद्रा मारोती मंदिर उघडले

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्याला ऐतिहासिक, पर्यटन तसेच धार्मिक महत्त्व आहे. वेरुळ येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर, खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिर, म्हैसमाळ येथील गिरजा देवी, बालाजी मंदिर, सुलीभंजन येथील दत्त धाम या मंदिरांमुळे, राज्य शासनाने गुरुवारी ( ता.सात) सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने वेरुळ येथील नगरीत ढोलताशा वाजवित पालखी मिरवणुकीद्वारे मंदिरात प्रवेश करण्यात आला. भद्रा मारोती मंदिरात ही वाद्याच्या गजरात मंदिर सकाळी नऊ वाजताच उघडण्यात आली.

नवरात्रीनिमित्त कोराडी मंदिरात सजावट, भाविकांनी घेतले दर्शन

राज्यातील मंदिरे आजपासून सुरू झाली आहेत. यात नागपुरातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे मंदिर देखील सुरू झाले आहे. नवरात्रीनिमित्त या मंदिरात आकर्षक सजावट कऱण्यात आली आहे. तसेच आज सकाळीच महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. यावेळी अनेक भाविक-भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर सुरू झाल्याचा आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

राज्य सरकारने नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (ता.7) पासून सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे. मात्र कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे भाविकांनी दर्शन घेत असतांना सर्व नियम व निकषांचे पालन करावे असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. अदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.7) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

  • कोल्हापूर - पहाटेपासून भाविकांनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली

    करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा दरवाजा गुरुवारी पहाटे पाच वाजता सचिव नायकवडी आणि व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते उघडण्यात आला.

सातारा : गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर देखील आज भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

  • दशभुजा गणपती मंदिर येथे राष्ट्रवादीची महाआरती

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांनी दशभुजा गणपती मंदिर येथे सकाळी महाआरती करत बाप्पा मोरया असा जयघोष केला. कोरोना महामारीमुळे अठरा महिने बंद असलेले मंदिर उघडून बाप्पाचे दर्शन घेता आल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोथरुड मधील तुळजा भवानी माता मंदिर, मृत्युंजय मंदिर, म्हातोबा मंदिर दर्शनासाठी खुले झाले. माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर, दत्ता सागरे, मिलिंद वालवडकर, निलेश शिंदे, ज्योती सुर्यवंशी, अर्चना चंदनशीवे, दिलीप कानडे, भुषण शिर्के व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मागील दीड वर्षांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे नायलासत्व मंदिरं बंद ठेवावी लागली होती. जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठया संख्येने जात असतात. पहिली लाट आली दुसरी लाट त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो. आशिर्वाद मागितले आहेत की, लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे.

  • संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे दर्शन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ई पास काढावी लागणार आहे. नागरिकांना दर्शनासाठी मास्क, दुपट्याचा वापर करावा लागणार आहे. हार-फुले तुरे सोबत आणता येणार नाहीत

पुणे - दगडूशेठ गणपती दर्शनाला रुपाली चाकणकर व खासदार वंदना चव्हाण उपस्थित

मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन, मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन. मुलगा पार्थ पवार, जयंत पाटील आणि मंत्री सुनिल केदारही उपस्थित

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे महालक्ष्मी मुंबई मातेचे दर्शनासाठी पोहचले. थोड्यात वेळात करणार आरती

  • नवरात्रोत्सवापूर्वी दोन दिवसांपासून तुळजापूर शहरात मोठी गर्दी झाली. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती गुरुवारी (ता. ७) सिंहासनावर अधिष्ठित केल्यानंतर अभिषेक होईल. दुपारी बाराला घटस्थापना होणार आहे.

  • पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सचा पूर्णत फज्जा उडाला. कोरोना नियमांचं पालन याठिकाणी दिसलं नाही. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे सांगणारे दत्तात्रय भरणे मात्र नियमांचे उल्लंघन करताना दिसले.

  • गेल्या काहीपासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.

  • कोरोना नियमांचे पालन करतच भाविकांना अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. यंदाच्या उत्सवात सप्तमातृका या संकल्पनेवर आधारित देवीच्या सालंकृत पूजा बांधल्या जाणार आहेत.

  • साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज(ता. ७) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास घटस्थापना होणार असून, यावेळी परंपरेप्रमाणे तोफेची सलामी दिली जाणार आहे.

  • नवरात्रासाठी नियमावली

    गुरुवार (ता. ७) पासून नवरात्र महोत्सव सुरू होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा करावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. मंदिरापुढे नियमांचे पालन करून साधा मांडाव घालावा, नागरिकांची गर्दी होईल अशी सजावट करू नये, मंडळात ४ फूट तर घरात २ फुटापेक्षा मोठी मूर्ती असू नये. मूर्ती विसर्जन करताना पर्यावरण पूरक कृत्रिम हौदात करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

  • ट्रस्ट, धार्मिक व्यवस्थापन यांनी धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे केव्हा खुली असतील याची वेळ निश्चित करून याचे काटेकोर पालन करावे. धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, थर्मल गणने तपासणी करावी, सॅनिटाइजरची सुविधा असावी. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष ठेवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com