
नाशिक : पुण्यातील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिचा वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला. या घटनेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरने येत्या २२ जूनपासून राज्यव्यापी लढ्याचा निर्धार केला आहे. ‘हुंडामुक्त महाराष्ट्र-हिंसामुक्त कुटुंब’ मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेला पुण्यातून सुरूवात होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.