

मुंबई - ‘राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे व्यासपीठ म्हणून ‘महालक्ष्मी सरस’ची ओळख आहे. आता जिल्ह्यातही बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यभर उमेद मॉल उभारले जातील,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. त्याचबरोबर मार्चपर्यंत २५ लाख ‘लखपती दीदी’ करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुल येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ‘उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’च्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२५’चे उद्घाटन आज झाले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेते,पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘उमेद अभियानाच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे. या माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात.
पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारले जातील. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.