
पुणे : ‘‘शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढीसाठी कृषी हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक वापराबरोबरच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करण्यासाठी राज्यात सहा विभागांमध्ये ‘सेंटर फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेन्ट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर (सीडसा) केंद्र स्थापन करण्यात येतील,’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.