
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवासभाडे आता १५ टक्क्यांनी (१०० रुपयात १५ रुपयांची वाढ) वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल, हे निश्चित आहे.