
पाली : राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्या अखेर रविवारी (ता.22) या सर्व धरणांमध्ये सुमारे 38.03 टक्के इतका म्हणजेच 544.04 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जलसिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. यामध्ये कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा आहे.