Usmanabad News: उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी

कशामुळं ही चेंगराचेंगरी झाली जाणून घ्या
Usmanabad News
Usmanabad News

उस्मानाबाद शहरातील उरुसात चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. उरुसात वळू उधळल्यानं गोंधळ माजला, त्यामुळं ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. (Maharashtra Usmanabad had stampede during Uroos 14 devotees injured)

Usmanabad News
सुप्रीम कोर्टाकडून सामूहिक बलात्कार प्रकरणात निर्दोष सुटला; पुन्हा केली हत्या, आता…

उस्मानाबाद शहरातील 'हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे' या उरुसात पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असतानाच यामध्ये एक वळू घुसला आणि तो उधळला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला, यामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

Usmanabad News
Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाऊन, फेसबुक-इन्स्टावरही हजारो वापरकर्त्यांना येतेय अडचण

दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच हा उरुस होत असून सर्वधर्मियांचा यामध्ये मोठा सहभाग असतो. दोन-तीन दिवसाच्या या सोहळ्यात रात्रभर विविध कार्यक्रमानिमित्त भाविकांची इथं मोठी गर्दी असते. त्याप्रमाणं यंदाही या उरुसात मोठी गर्दी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com