एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांची लशीकडे पाठ; राज्यात ठाणे जिल्हा आघाडीवर

१० जिल्हे अजूनही लक्ष्यापासून दूरच
corona vaccine
corona vaccinesakal media
Updated on

मुंबई : ओमिक्रॉनसह (Omicron variant) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (corona third wave) शक्यतेमुळे लसीकरणावर जोर (corona vaccination) देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र राज्यात अद्याप १ कोटीपेक्षा अधिक लाभार्थी (More than one core beneficiary) लशीच्या पहिल्या मात्रेपासून (First dose) दूर आहेत. ठाणे, नाशिकसह राज्यातील १० जिल्ह्यांनी अद्याप पहिल्या मात्रेचे निर्धारित लक्ष्य गाठलेले नाही.

पुण्यासह मुंबईने आपल्या पहिल्या मात्रेचे लक्ष यशस्वीपणे गाठले आहे. त्यांची वाटचाल पूर्ण लसीकरणाकडे सुरू झाली आहे. लशीची पहिली मात्रा राहिलेले सर्वाधिक लाभार्थी हे ठाणे जिल्ह्यात आहेत. तेथे १६,८५,७६९ लाभार्थी पहिल्या लशीच्या मात्रेपासून अद्याप वंचित आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात लशीची पहिली मात्रा राहिलेले सर्वाधिक लाभार्थी आहेत. या जिल्ह्यात १४,०७,७५९ लाभार्थ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही.

ठाणे, नाशिक जिल्ह्यासह जळगाव, सोलापूर, नगर, नांदेड, औरंगाबाद, बीड, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतलेली नाही. जळगाव (११,०८,१२०), सोलापूर (१०,२२,६९५), नगर (१०,१६,३६०), नांदेड (१०,१३,६८५), औरंगाबाद (९,३८,४७२), बीड (८,०६,६०५), यवतमाळ (७,३९,१०९), लातूर ६,८६,६१८ लाभार्थी लसीकरणापासून अद्याप दूर आहेत.

जिल्हा पहिला राहिलेली मात्रा
ठाणे - १६,८५,७६९
नाशिक - १४,०७,७५९
जळगाव - ११,०८,१२०
सोलापूर - १०,२२,६९५
अहमदनगर -१०,१६,३६०
नांदेड - १०,१३,६८५
औरंगाबाद - ९,३८,४७२
बीड - ८,०६,६०५
यवतमाळ -७,३९,१०९
लातूर -६,८६,६१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com