भाजप+शिवसेना = 156, पण हे तिन्ही एकत्र आले तरी 156 | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

शिवसेना 57, काँग्रेस 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 54 असा आकडाही 156 होत असल्याने ही नवी युती राज्यात उदयास येईल का हा प्रश्न आहे.

मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीला या विधानसभा निवडणुकीत 156 धावांचा आकडा गाठण्यात यश आले असून, अद्याप युतीची सत्ता होईल असे निश्चित नाही. तर, दुसरीकडे शिवसेना 57, काँग्रेस 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 54 असा आकडाही 156 होत असल्याने ही नवी युती राज्यात उदयास येईल का हा प्रश्न आहे.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मी भाजपच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या, आता त्यांनीही आम्हाला समजून घ्यावे. आम्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलून ठरवू. आता त्यांनीही दिल्लीतील नेत्यांशी बोलून ठरवावे. महाराष्ट्रातील जनतेने आमचे डोळे उघडणारे निकाल दिले आहेत, असे सांगून एक प्रकारे भाजपला इशाराच दिला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 50-50 फॉर्म्युलाची चर्चा झाल्याशिवाय पुढे काही होणार नाही. आम्हाला सत्ता स्थापनेची घाई नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

तर, दुसरीकडे काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून खलबते सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी हात मिळविण्याचा करण्याचा आमचा विचार नाही, असे स्पष्ट केलेले आहे. पण, राज्यात राजकीय समीकरण कधी बदलेले हे सांगणे आताच कठीण आहे. दिवाळीनंतर राज्यात कोणाचे सत्ते फटाके कोणाचे उडणार हे निश्चित नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result BJP shivsena lead but not clear political situation