Vidhan Sabha 2019 : सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

‘ज्यांच्या हातात तुम्ही मागच्या वेळी सत्ता दिली, त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. राज्याच्या भरीव विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

विधानसभा 2019 : चाकण (जि. पुणे) - ‘ज्यांच्या हातात तुम्ही मागच्या वेळी सत्ता दिली, त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. राज्याच्या भरीव विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

महाआघाडीच्या चाकण येथे शुक्रवारी झालेल्या सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, खेड तालुक्‍यात धरणे झाली, शेती बागायती झाली; पण शेती दिवसेंदिवस कमी झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आराखडा मी केला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव व इतर भागांत औद्योगिक वसाहती झाल्या. त्यात लोकांना रोजगार मिळाला. परराज्यातील कामगारही येथे आला. येथे गुन्हेगारी वाढली. ती मोडीत काढण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 sharad pawar politics