
Congress Exposes Massive Discrepancy—6.5 Lakh Voters Added to Maharashtra Rolls in the Final Four Days Before Assembly Polls.
Sakal
मुंबई : २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान चार महिन्यांत राज्यात ४१ लाख मतदार वाढले, यावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात होता. आता त्यामध्ये अजून भर पडली असून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या केवळ चार दिवसांत ६ लाख ५५ हजार ७०९ मतदारांची वाढ राज्याच्या यादीमध्ये झाल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीतूनच दाखवून देत या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या चार दिवसात साडेसहा लाख मतदार कसे वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.