पुणे: उष्णतेने भाजून काढल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. अंदमानजवळील समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून निकोबार बेटांवर रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनची चाल यंदा वेगवान होण्याची दाट शक्यता असून येत्या चार ते पाच दिवसांत मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्येही, दक्षिण अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.