esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

विजा, मेघगर्जनेसह दोन दिवस पावसाचा अंदाज

विजा, मेघगर्जनेसह दोन दिवस पावसाचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात परतीचा पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत (ता. ११) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. १५) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

कोकण : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर.

loading image
go to top