नाशिकसह मुंबईकर गारठले, पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Updatesakal

मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबई, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमानात घट (Maharashtra Weather Update) झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik Weather) ७.१ टक्के, तर निफाडमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तापमान ६.१ डिग्रीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. येत्या दोन दिवसांत आणखी थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिल आहे.

Maharashtra Weather Update
राज्यात ३ दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात विदर्भात आणि मराठवड्यात पाऊस पडत आहे. तसेच काही भागात गारपीट देखील झाली आहे. उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. मुसळधार पावसानंतर, उत्तर भारतातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि काही भागांमध्ये बर्फवृष्टीही होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम विदर्भावर दिसून येत असून विदर्भातून वाशिममध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पण, पाऊस आणि वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंशाने खाली उतरणार आहे. त्यामुळे काही भागात थंडीचं प्रमाण वाढणार असून नागरिकांना आणखी बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईकरांनी घेतला थंडीचा अनुभव -

मुंबईमध्ये सतत दमट वातावरण असतं. त्यामुळे मुंबईकरांना नेहमी उकाडा सहन करावा लागतोय. पण, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर थंडीमुळे गारठून गेले आहेत. मुंबईत रविवारी तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता.

कोणत्या शहरात किती तापमान? -

  • नाशिक - 7.3

  • जळगाव - 9

  • मालेगाव - 10.2

  • सांताक्रूझ - 13.2

  • कूलाबा - 15.2

  • डहाणू - 15.5

  • माथेरान - 10.6

  • पुणे - 12

  • बारामती - 13.8

  • सांगली - 15.9

  • ठाणे - 18

  • नांदेड - 17.6

  • चिकलठाणा - 11

  • जालना - 12

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com