हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधानभवन

हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

sakal_logo
By
रामनाथ दवणे

मुंबई : हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly Session 2021) नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील अधिवेशनाबाबत मतभेद दिसून येते होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly Session 2021 Mumbai) होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: मुंबईत का होऊ शकत नाही अधिवेशन; वाचा...

काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. तसेच एक पत्र देखील व्हायरल झालं होतं. पण, अधिवेशनाबाबत अधिकृत निर्णय झाला नव्हता. आता हे अधिवेशन २२ ते २९ डिंसेबरला होणार असल्याचं समजते आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नागपूर अधिवेशनाला विरोध आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावे यासाठी आग्रही होतं. त्यामुळे अधिवेशन नागपूरला घ्यावं की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होते. तसेच चार-पाच दिवसांच्या अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी तेवढा निधी विदर्भाला उपलब्ध करून देण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली आहे. आता हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे.

loading image
go to top