Ajit Pawar : अजित पवार फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला मी बिलंदर म्हणणार नाही; कारण...

winter sessin 2022
winter sessin 2022esakal

Maharashtra Winter Session 2022 : विधानसभेमध्ये आज राज्याचे महत्त्वाचे नेते बोलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दे मांडले.

शेतकऱ्यांविषयी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने सिबिल विचारु नये, मग ती बँक खाजगी असो की राष्ट्रीयकृत. सिबिलचा मुद्दा कोणी उपस्थित केला आणि तक्रार आली तर नक्की कारवाई करु, असं ते म्हणाले.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

त्यानंतर अजित पवार यांनी बोलतांना मोठ्या निर्णयांचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, राज्याच्या हिताच्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या, रस्त्यांसंदर्भातल्या घोषणा झाल्या. परंतु सभागृहाच्या रिवाजाप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री शेवटच्या दिवशी या घोषणा करत असतात. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या घोषणा केल्या. असं असलं तरी मी त्यांना बिलंदर म्हणणार नाही, ते इथं चालणारही नाही. असं पवार म्हणाले.

यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे बघत, 'माझ्याकडे बघत हात चोळू नका' असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

यावेळी अजित पवार यांनी पीक विम्यासंदर्भातला एक मुद्दा उपस्थित करुन शेतकऱ्यांना अत्यल्प रकमा आल्याचं नमूद केलं. यासंदर्भात ठोस निर्णय आणि ठाराविक रक्कम देण्याचा निर्णय घ्यावा, असंही पवारांनी सरकारला सुचवलं.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. विदर्भासाठी समग्र विकासाचा आराखडा मंजूर केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सभागृहात आभार मानले. विदर्भातल्या बँका बंद पडल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असला तरी त्या बँका त्यांच्याच हातात होत्या. विरोधकांचं सरकार असतांना विदर्भातील बँका कमजोर करण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही त्या बँका पुरुर्जीवित करण्यसाठी ५०० कोटी दिले परंतु बँकांची अर्थस्थिती सुधारली नसल्याचं फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com