
पुणे - देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल ३३ लाख ५० हजार कोटींचे कर्ज थकित आहे. सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे ७ लाख ३८ हजार कोटींचे कर्ज थकलेले आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीवरून पुढे आली आहे.