
यवतमाळ - महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे पहिले राज्य, महिलांच्या आरक्षणासाठी सर्वांत आधी तरतूद करणारे राज्य म्हणून पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यात आता उच्च शिक्षणात महिलांचा देशात सर्वाधिक टक्का असलेले राज्य म्हणूनही महाराष्ट्राची ओळख पुढे आली आहे. एका वर्षात सर्वाधिक पीएचडी मिळविणाऱ्या महिलांचे राज्य म्हणूनही महाराष्ट्राची मान उंचावली आहे.