Suger : राज्याच्या साखरनिर्मितीत ३० लाख टनांची घट; साखर उताराही घटला

केवळ आठ कारखान्यांचा अपवाद वगळता मार्चअखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला.
sugar
sugarsakal
Updated on

सोमेश्वरनगर - केवळ आठ कारखान्यांचा अपवाद वगळता मार्चअखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला असून साखर उतारा आणि साखरनिर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात ८० लाख टन साखरनिर्मिती झाली असून गतहंगामाच्या तुलनेत तब्बल ३० लाख टनांची घट झाली आहे.

साखर उताऱ्यातही ०.७६ टक्के इतकी अत्यंत मोठी घट झाली आहे. कारखान्यांच्या आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. दरम्यान, गाळप, उतारा आणि साखरनिर्मिती या तिन्ही बाबतीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे.

राज्याचा हंगाम उशिरा म्हणजे १५ नोव्हेंबरला सुरू झाला तरीही मार्चअखेर आटोपला आहे. २०० कारखान्यांपैकी १९२ कारखाने बंद झाले आहेत. आतापर्यंत ८४७ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून अवघ्या ९.४७ टक्के उताऱ्यानुसार ८० लाख २६ हजार टन साखरनिर्मिती झाली आहे.

गतहंगामात १०७३ लाख टन उसाचे गाळप होऊन १०.२३ टक्के उताऱ्यानुसार ११० लाख टन साखरनिर्मिती झाली होती. उताऱ्यात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांच्या एफआऱपीवर आणि कारखान्याच्या साखरनिर्मितीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. ३० लाख टनांची घटही साखरउद्योगातील अर्थकारणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. यामुळे सुमारे अकरा हजार कोटींचा फटका बसणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा गाळप (१२५ लाख टन) आणि उतारा (११.४१ टक्के) मिळवून निर्विवादपणे प्रथम स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात १०३ लाख टन गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांनी १११ लाख टन गाळप करत तेहतीस कारखाने असलेल्या सोलापूरला (१०२ लाख टन) मागे टाकत गाळपात तिसरे स्थान पटकावले आहे. उताऱ्याबाबत कोल्हापूर, सांगली वगळता सर्वच जिल्ह्यांची अवस्था निराशाजनक आहे.

साखरआयुक्तालयाच्या अहवालानुसार जिल्हानिहाय गाळप

जिल्हा - कारखाने - गाळप (टन) - साखरनिर्मिती (क्विं.) - उतारा(%)

कोल्हापूर - २३ - १२५३६०९७ - १४२९९५३८ - ११.४१

सांगली - १७ - ७७३८३६७ - ८१६०८३० - १०.५५

सातारा - १७ - ९४३१२८८ - ९१५०१२७ - ९.७०

पुणे - १४ - १११४७८८८ - १०६७६९७६ - ९.५८

सोलापूर - ३३ - १०२०६५७१ - ८६४१८६३ - ८.४७

धाराशिव - १२ - २८२९८०४ - १९२८४६० - ६.८१

अहिल्यानगर - २२ - १०३३४३४९ - ९१०१०२७ - ८.८१

नाशिक - ४ - १०५५३१६ - १०५१११४ - ९.९६

नंदूरबार - २ - ७८८१२० - ५००९०० - ६.३६

जळगाव - १ - १०४३२९ - १०५०५० - १०.०७

संभाजीनगर - ७ - १८५२२१४ - १८८०९८९ - १०.१६

जालना - ४ - २१६८५५७ - १८४१२२६ - ८.४९

बीड - ८ - ३१७९९०६ - २१५८३१६ - ६.७९

परभणी - ७ - २८६१८०७ - २८२३९५० - ९.८७

हिंगोली - ५ - १५२५८८७ - १५१०२५० - ९.९०

नांदेड - ६ - २०८४८७६ - १९९६६६० - ९.५८

लातूर - ११ - ३३९९९७९ - ३२११९३२ - ९.४५

बुलढाणा - १ - ११४३२५ - ११३३८० - ९.९२

यवतमाळ - ३ - १०५१९२३ - ९२८३८० - ८.८३

नागपूर - १ - १६६८८० - -

भंडारा - २ - २०१३६५ - १८४९६५ - ९.१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com