
Mahatma Gandhi यांना ब्रिटीश सरकार १०० रुपये पेन्शन द्यायचे; भाजपा नेत्याचा दावा
भाजपा नेते अवधूत वाघ यांनी एक मोठा दावा केला आहे. महात्मा गांधींना ब्रिटीश सरकार दरमहा पेन्शन द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. अवधूत वाघ यांनी गांधीजींची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली आहे. त्यांनी याविषयीचं ट्वीट केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये अवधूत वाघ म्हणतात, आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना देखील ब्रिटिश सरकार दरमहा 100 रुपये द्यायची. त्यावेळी सोने 18 रुपये तोळा होते. म्हणजे तत्कालीन 100 रुपये आजच्या 275000 रुपया समान होते. पण मी याला पेंशन म्हणणार नाही. सावरकरांच्या 60 रुपयांच्या मानाने 66% जास्त रक्कम आहे ही.
यापूर्वीही अनेकदा अवधूत वाघ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे या आधीही चर्चेत आले होते. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हणून संबोधलं होतं. त्यावरुनही त्यांना जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.