महाविकास आघाडीचे खातेवाटपावर शिक्‍कामोर्तब?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मंत्रिमंडळ खातेवाटपाची शक्‍यता 

  • राष्ट्रवादी काँग्रेस - अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य, सहकार, सार्वजनिक बांधकाम.
  • शिवसेना - गृह, नगरविकास, परिवहन, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण.
  • काँग्रेस - महसूल, ऊर्जा, जलसंपदा, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी होऊन १४ दिवस उलटल्यानंतर महाविकास आघाडीचे खाते वाटपावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे समजते. त्यामुळे कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे, तर गृहनिर्माण आणि अर्थ ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील, असे सांगण्यात आले.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्‍यता असताना अधिवेशनापूर्वी खातेवाटप जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनी शपथ घेतली ते देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह या मंत्र्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी असेल, असेही सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aghadi post distribution final