
State Election Commission Defies Opposition, Kicks Off Preparations for Local Body Elections in Maharashtra.
Sakal
मुंबई : सदोष मतदारयाद्यांमध्ये सुधारणा केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून करण्यात आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मतदारयाद्यांवर घेतलेल्या आक्षेपांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्याच्या निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्राद्वारे कळविली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज आयोगाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करून दिली जावी, असे निर्देश दिले आहेत.