मविआ विधान परिषदेतही भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; सहा जागा लढवणार

Mahavikas Aghadi and BJP
Mahavikas Aghadi and BJPSakal
Updated on

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीवरून राजकारण तापलेले असताना आता महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार असल्याची समोर आले आहे. या निवडणुकीत आघाडीतील प्रत्येक पक्ष दोन जागा लढवणार आहे. (Mahavikas Aghadi will contest for six seats in the Legislative Council political news)

राज्यसभेच्या निवडणूकनंतर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक मुंबईतील Trident हॉटेल मध्येच पार पडली. या बैठकीत अजित पवार, वळसे पाटील,जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एच के पटील, खरगे, नाना पटोले, एकनाथ शिंदे अनिल परब, अनिल देसाई तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी एकीचं आवाहनही यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमदारांना केलं, या नंतर झालेल्या बैठकीत विधान परिषदेतच्या सहाही जागा महाविकास आघाडी लढवणार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com