उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; 169 आमदारांच्या पाठिंब्यांने बहुमत सिद्ध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. 169 मते ठाकरे यांच्या बाजूने पडली. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. 

मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. 169 मते ठाकरे यांच्या बाजूने पडली. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, असा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. यास अनुमोदन नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले.  

भाजप आमदारांनी बहुमत सिद्ध करताना सभागृहातून सभात्याग करत महाविकास आघाडीच्या विरोधात घेषणाबाजी केली. बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवरून ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रो-टेम स्पीकरवरून देखील कडाडून टीका केली.

भाजप सभागृहातून बाहेर पडण्या अगोदर  फडणवीस म्हणाले की, नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? 170 आकडा तुमच्याकडे आहे तर मग भीती कसली? गुप्त मतदान झालं तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे. त्यानंतर घोषणाबाजी करत भाजपचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas aghadi win Floor test in Maharashtra Assembly