

मुंबई : ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची सोडत (लकी ड्रॉ) काढला जाणार आहे. त्यामध्ये विजेते ठरणाऱ्यांना स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच भेट मिळणार आहे. या योजनेसाठी एक जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा त्याहून अधिक वेळा ऑनलाइन भरलेले लघु दाब वीज ग्राहक पात्र असतील.