Sports Teacher
sakal
पुणे - राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनांवरील पायाभूत पदांची उजळणी करून पदे नव्याने निश्चित करण्यात आली आहेत. त्यात केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद शालेय शिक्षण विभागाने मंजूर केले आहे. त्यानुसार केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षकांची चार हजार ८६० पदे मंजूर करण्यात आली आहेत.