Makar Sankranti 2023 : संक्रांतीला पूजला जाणारा सुगड आला कुठून? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 : संक्रांतीला पूजला जाणारा सुगड आला कुठून?

Makar Sankranti 2023 : नवीन वर्ष आलं की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत... देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होणाऱ्या या सणाला महाराष्ट्रातही विशेष महत्त्वं आहे. या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्वं आहे तेवढंच सुगड पूजनालाही विशेष महत्त्वं आहे. अनेकांना सुगड पूजा माहिती आहे. पण नवविवाहित महिलांना जर याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला सुगड पूजा, विधी आणि साहित्य सांगणार आहोत.

हेही वाचा: Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक कार्सचा धुमाकूळ, लाँच झाल्या या टॉप-५ दमदार गाड्या

सुगड म्हणजे नेमकं काय?

तर सुगड हा शब्द आलाय 'सुघट' या शब्दावरून. म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. नंतरच्या काळात याचा अपभ्रंश होऊन त्याला 'सुगड' म्हणायला लागले. लाल आणि काळा रंगाचे छोटे माठ म्हणजे घट.या घटात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतिक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं.

हेही वाचा: Winter Health : हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

सुगडाची पूजा कशी करतात?

सुगडाची पुजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे.सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे.

हेही वाचा: Tilache Ladoo Recipe : फक्त दहा मिनिटांमध्ये असे बनवा टेस्टी तिळाचे लाडू

काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.

हेही वाचा: Makar Sankranti : मकर संक्रांती निमित्त काढा अशा रांगोळ्या; घरात येईल सकारात्मकता

काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला ववसा दिला जातो. शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडीसोबत ओटी भरली जाते. तिचा हलव्याच्या दागिन्यांनी साज श्रृंगार केला जातो, अशी परंपरा आहे.