भारतात अफ्रिकेतील मलावी आंबे दाखल | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मलावी आंबे

भारतात अफ्रिकेतील मलावी आंबे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दिसायला अगदी हूबेहूब हापूस आंब्यासारखा, चवीला आणि वजनालाही सारखाच वाटणारा कोकणातील हापूस आंब्याचा जळा भाऊ अफ्रिकेतील ‘मालावी आंबा` अखेर भारतात दाखल झाला आहे. उद्यापर्यंत हा आंबा वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. फळ मार्केटचे संचालक आणि व्यापारी संजय पानसरे यांनी खास हा आंबा आयात केला आहे.

अफ्रिका खंडातून दरवर्षी थंडीच्या महिन्यांत भारतात हे मालावी आंबे विक्रीसाठी उपलब्ध होतात. संजय पानसरे यांनी मालावी आंब्याचे एकूण २३० बॉक्स मागवले आहेत. गुरुवारी या आंब्याचा माल मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. पूढच्या आठवड्यापासून या आंब्याचा हंगाम सुरु राहणार आहे. तब्बल एक महिना मालावी आंब्याचा हंगाम असतो. साधारणपणे १५ डिसेंबर पर्यत हा आंबा वाशीच्या फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

एका किलोला १२०० ते १५०० रुपयांपर्यंतचा अंदाजे भाव मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. हे आंबे वजनाला हापूस आंब्यासारखेच असतात. मोठ्या आकाराचे आंबे एका किलोत ३ बसतात. तर मध्यम आकाराचे आंबे एका किलोत ४ नग बसतात. भारतीय बाजारपेठांमध्ये अफ्रिकेतील आंबा मालावी मँगो नावाने प्रसिद्ध आहे. अनेक लोक हा आंबा आवडीने खातात. परंतू हा आंबा मर्यादीत जागेत लावला असल्याने फक्त ३० टन आंबा बाजारात येणार असल्याचे संजय पानसरे यांनी सांगितले.

कोकण ते अफ्रिका प्रवास

हापूस आंब्याच्या गोडीने संपूर्ण जगाला वेड लागले आहे. २०१० ला काही प्रयोगशील कंपन्‍यांनी कोकणातील दापोली आणि रत्नागिरी भागातून हापूस आंब्याच्या फांद्या अफ्रिकेतील काही देशांमध्ये घेऊन गेल्या. येथील मालावी देशातील माती कोकणातील मातीसारखी असल्याने हापूस आंब्याच्या फांद्याची लागवड केली. या ठिकाणी एका एकरात ४०० आंब्याची झाडे असे एकूण ४०० एकरावर आंब्याची बाग तयार केली आहे. आता या बागेला आंबे लागण्यास सुरुवात झाल्यानंतर तेव्हा पासून भारतात हे आंबे मालावी नावाने पाठवले जातात.

loading image
go to top