Malegaon Bomb Blast Case: मालेगाव खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने कोर्टाने प्रज्ञा ठाकूरांना फटकारले, NIA टीम जाणार घरी

Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए आरोपींचे जबाब नोंदवत आहे. मात्र प्रज्ञा सिंह ठाकूर सुनावणीस उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना फटकारे आहे.
Malegaon Bomb Blast Case
Malegaon Bomb Blast Case esakal
Updated on

Malegaon Bomb Blast Case: 

विशेष एएनआय न्यायालयाने पुन्हा एकदा भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना फटकारले आहे. वारंवार कोर्टाने बजावून देखील प्रज्ञा सिंह ठाकूर न्यायालयात हजर राहत नाहीत. याप्रकरणी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. विशेष न्यायालयाने जारी केलेले जामीन वॉरंट रद्द केले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर हे सप्टेंबर 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

विशेष एएनआय न्यायालयाने मुंबई एएनआय टीमला भोपाळ येथील एएनआय टीमसोबत संपर्क करुन प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहे. वैद्यकीय अहवालाचे आधारे न्यायालयाने आज त्यांना सूट दिली. (Malegaon Bomb Blast Case)


मात्र वारंवार आरोग्याचे कारण दिल्यामुळे एएनआय टीम थेट प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या घरी जाणार आहे. CrPC 313 अंतर्गत जबाब नोंदवण्यात त्याची अनुपस्थिती न्यायालयीन कामकाजात अडथळा आणत आहे आणि खटल्याला विलंब करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Malegaon Bomb Blast Case
NCP Party Symbol: कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केल्यास गंभीर विचार करू ; सुप्रीम कोर्टाने टोचले अजित पवार गटाचे कान

एनआयए कोर्ट सध्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवत आहे.

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलवर बसवलेल्या स्फोटक यंत्राच्या स्फोटात सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते.

Malegaon Bomb Blast Case
Hingoli Lok Sabha 2024: हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदे गटावर नामुष्की, नेमकं काय घडलं? कुणाला मिळालं तिकीट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com