Nitin Gadkari: रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा; मनसे आमदाराचा गडकरींना टोला

देशात वर्षभरात 500,000 रस्ते अपघात
Nitin Gadkari: रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा; मनसे आमदाराचा गडकरींना टोला

अपघातांना आळा घालण्यासाठी आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. आता कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांना देखील आता सीट बेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्र्यांच्या या घोषणेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट करतं गडकरींना टोला लगावला आहे.

ट्वीटमध्ये राजू पाटील यांनी गडकरींकडे एक मागणी केली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्यांना त्या खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा अशी मागणी ट्विटद्वारे राजू पाटील यांनी केली आहे. हे ट्वीट करताना त्यांनी #आता_सहन_नाही_होत असा हॅशटॅग वापरला आहे.

आमदार राजू पाटील यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, "सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे, तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!" महत्त्वाचं म्हणजे, राजू पाटील यांनी हे ट्वीट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींना टॅग केलं आहे.

याआधी गडकरींनी अपघाताबद्दल माहीती देताना सांगितले की, देशात वर्षभरात 500,000 रस्ते अपघात झाले आहेत. ते म्हणाले की, 60 टक्के रस्ते अपघातांमध्ये 18-34 वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. या नंतर सीट बेल्ट लावणं बंधनकारक हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगानं धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com