
मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात गुरुवारी दिली. तसेच पीकविमा योजनेत विम्याचे दावे नाकारणे, ओरिएंटल कंपनीने २०२ कोटी वितरणास नकार दिला असून, यंदाच्या हंगामातील पीकविमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचेही उत्तरात म्हटले आहे.