
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळले.
कोकाटे यांनी हा कट असून बदनामीसाठी करण्यात आलेला प्रकार असल्याचा आरोप केला आणि कोर्टात जाण्याचा इशारा दिला.
त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत राजीनामाही देण्याची तयारी दर्शवली.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. “मला रमी खेळता येत नाही, आणि मी कोणताही गेम खेळलो नाही,” असा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी विरोधकांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.