
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषण सुरु केलं आहे. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. जिकडे-तिकडे भगवं वादळ दिसून येत आहे. मात्र मराठा मुंबईतून वैतागून जावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुरापती केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.