Manoj Jarange : जरांगेंवर ड्रोनने टेहळणी,वडेट्टीवार;जरांगेच्या संरक्षणात वाढ करण्याचे शंभूराज देसाईचे आश्वासन

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्यात आलेली असून त्यांच्या सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून सविस्तर अहवाल घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत शून्य प्रहरात दिले.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्यात आलेली असून त्यांच्या सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून सविस्तर अहवाल घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत शून्य प्रहरात दिले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरंगे पाटील यांच्या सुरक्षेबाबत मुद्दा उपस्थित केला होता. ‘‘अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे,’’ असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. ‘‘अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे,’’ अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

अंतरवाली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे असून जरांगे यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच याबाबत सविस्तर निवेदन सरकारने करावे, अशी सूचना यांनी यावेळी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून सविस्तर अहवाल घेऊन त्याबाबत सभागृहात निवेदन करू. त्याचबरोबर जरांगे पाटील यांना अधिकचे संरक्षण पुरविण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.