Maratha Reservation : मराठ्यांचं आंदोलन कसं असेल? जरांगे पाटलांनी दिल्या 'या' सूचना

Manoj Jarange Announces Rasta Roko : राज्य सरकारने बोलवलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजारा १० टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
manoj jarange guidelines for rasta roko Maratha Reservation Agitation latest news rak94
manoj jarange guidelines for rasta roko Maratha Reservation Agitation latest news rak94

Manoj Jarange guidelines for rasta roko latest news : राज्य सरकारने बोलवलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजारा १० टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र सरकारने सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल हे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. . येत्या २४ तारखेपासून राज्यभर गावोगावी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या सूचना जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत .

राज्यभर आंदोलन कसे असेल?

मनोज जरांगे पाटील यांनी २४ फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ही तारीख निवडण्यामागचं कारण देखील सांगितलं, आज २१ तरीख आजचा दिवस बैठकीत गेला, २२ आणि २३ फेब्रुवारी निवेदन द्यावे लागेल. पोलीस स्टेशन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन हे कायमस्वरुपीसाठी असेल.

आपण आपलं गाव सांभाळायचं, कोणी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं नाही. याचा फायदा म्हणजे गोरगरीब मराठ्यांचा वाचेल. दुसरं पूर्ण गाव आंदोलनात उभे राहिल्याने शक्ती वाढेल, आंदोलन गावात असल्याने घराला कुलूप लावून लोक आंदोलनाच्या केंद्रावर उपस्थित राहू शकतात.

आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. माझा किंवा इतर कोणाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नाही. या आंदोलनातून सगेसोयऱ्याची अमंलबजावणी करायला भाग पाडायचं आहे. यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपल्या गावात आंदोलन करायचं आहे.

manoj jarange guidelines for rasta roko Maratha Reservation Agitation latest news rak94
Manoj Jarange : ''24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको अन्...'' मनोज जरांगेंनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा

कायदा आणि पोलिसांचा आदर करा

जरांगे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या गावात, आपल्या रस्त्यावर रास्तारोको करायचा आहे. शहरात राहणाऱ्यांनी शहरात रास्तारोको करायचा. हे आंदोलन आदर्श असणार आहे. आंदोलनात जाळपोळ करायची नाही.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे, सगळं भान ठेवून आंदोलन करायचं. आंदोलन सकाळी साडेदहा वाजता सुरू करायचं. संपूर्ण गाव त्या आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन यायचं.

आपण आंदोलन स्थळाबद्दल पोलीसांना माहिती देणं काम आहे. त्यांना परवानगी मागणं आपलं काम आहे. त्यांनी परवानगी दिली किंवा नाही दिली तरी आंदोलन करायचं असेही जरांगे यांनी यावेळी सांगितलं . आपण कायदा आणि पोलिसांचा आदर करा. निवेदन द्यायचं काम करा असेही जरांगे म्हणाले.

manoj jarange guidelines for rasta roko Maratha Reservation Agitation latest news rak94
Pandhari Sheth Phadke : बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन, कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका..

विद्यार्थ्यांना अडचण येऊ देऊ नका

आंदोलन सकाळी साडेदहा ते एक पर्यंत आंदोलन करायचं. बारावी बोर्डाचे पेपर सकाळी १० वाजता सुरू होतात आणि एक पर्यंत संपतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही असे जरांगे म्हणाले. ज्यांना साडेदहा ते एकच्या दरम्यान आंदोलन शक्य झालं नाही, त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तारोको आंदोलन रोज करायचं आहे असेही जरांगे यांनी सांगितलं. तसेच बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचण येऊ द्यायची नाही असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं.

परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना आपल्या मोटरसाकलवर सोडून या अशा सूचना देखील जरांगे यांनी यावेळी मराठा आंदोलकांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने तुमच्या विचाराने शक्य असल्यास वेळेत बदल करा असेही जरांगे म्हणाले. असं आंदोलन देशाने पाहिलं नसेल. कोणची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही पण पुढेही जाऊ द्यायची नाही.

२४ तारखेला राज्यभरातील रस्त्यांवर रास्तारोको आंदोलन करायचं आणि दुपारी एक वाजता रस्ता मोकळा करायाचा, पोलीसांनी सांगायचे वेळ येऊ देऊ नका असेही जरांगे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com