CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

CM Devendra Fadnavis reacts after Manoj Jarange ends Maratha agitation: मराठा आरक्षण आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर अतिशय टोकाची टीका केली होती.
Maharashtra CM Devendra Fadnavis shares his first reaction after Manoj Jarange successfully concluded the Maratha reservation agitation.
Maharashtra CM Devendra Fadnavis shares his first reaction after Manoj Jarange successfully concluded the Maratha reservation agitation.esakal
Updated on

CM Devendra Fadnavis First Reaction on Manoj Jaranges Agitation end : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी अखेर संपवले आहे. सरकारने या आंदोनलावर यशस्वीपणे तोडगा काढला आहे. मात्र आंदोलन कालावधीत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष्य केलं होतं. जोरदार टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांनी अगदी व्यवस्थित उत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, ‘’सातत्याने राजकारणात टीका ही सहन करावी लागते, आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही. कारण, माझ्यासमोर एकच ध्येय होतं, की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत. दोन समाजाता तेढ निर्माण होणार नाही, दोन समजात, याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही. अशाप्रकारचा निर्णय आपल्याल करावा लागेल. कायदेशीर निर्णय आपल्याला करावा लागेल.’’

तसेच,‘’म्हणून या संदर्भात जे काही कायदेशीर आहे, त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहीजे. की ज्यांनी खूप चांगलं काम यामध्ये केलेलं आहे. खूप मेहनत यामध्ये केलेली आहे. पुढेही ही समिती सातत्याने काम करेल.’’ असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Maharashtra CM Devendra Fadnavis shares his first reaction after Manoj Jarange successfully concluded the Maratha reservation agitation.
Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

याचबरोबर ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समजाकरता काम कालही करत होतो, आज करतो आणि उद्याही करत राहील. मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा महाराष्ट्रातील कुठलाही समाज असो प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो, त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हारही मिळतात.’’ असं म्हणत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com