भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, 'पक्षात येण्यासाठी मोठी रांग'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठी रांग

- काही नेत्यांचा प्रवेश येत्या 1 सप्टेंबरला होणार.

पुणे : भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठी रांग लागली आहे. यातील काही नेत्यांचा प्रवेश येत्या 1 सप्टेंबरला होणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

कौन्सिल हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत आहेत. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टिमबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, आमचा साऊंड सिस्टिमला विरोध नाही. मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडू नये. मिरवणुकीत रात्री बारानंतर वाद्यांना परवानगी शक्य नाही. मात्र, 7 ते 12 सप्टेंबर या कालावधीत रात्री बारापर्यंत वाद्यांना परवानगी देण्यात आली आहे.

तसेच चारऐवजी सहा दिवस रात्री बारापर्यंत मुदत आहे. राज्यातील इतर भागात जिल्हाधिकारी मागणीप्रमाणे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Political Leaders are Interested to Join BJP says Chandrakant Patil