esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

HSC_Students

दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागला तेव्हापासून ट्विटरवर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छां दिल्या जात आहे. अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना खचून न जाता वेळेचा सदुपयोग करून जोमाने अभ्यास करा. यश तुमचंच आहे. असे अनेक संदेश दिले जात आहेत. 

बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले....

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : कोरोना संकटात बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर आज दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. यात ९०. ६६ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागला तेव्हापासून ट्विटरवर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छां दिल्या जात आहे. अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना खचून न जाता वेळेचा सदुपयोग करून जोमाने अभ्यास करा. यश तुमचंच आहे. असे अनेक संदेश दिले जात आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बारावीची परीक्षा म्हणजे विदयार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला. यासाठी सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन. एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही, असे काहीही नाही. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी महत्वाचा असणारा टप्पा पार केलेल्या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. इथून पुढे करिअरच्या दृष्टिने आपला महत्वाचा काळ सुरु होणार आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी निराश होऊ नये. पुढील ताकदीने प्रयत्न करा, जिद्दीनं यश मिळवा. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. अपयश आले असल्यास खचुन जाऊ नका. कोरोना काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून जोमाने अभ्यास करा. यश तुमचंच आहे. 

आमदार रोहित पवार म्हणाले, बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. एक मोठा शैक्षणिक टप्पा तुम्ही सर केला असला तरी यानंतर खरी कसोटी आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. लहारो से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनवालोंकी कभी हार नहीं होती.

loading image