गायधरी घाटात बस कोसळली,तीन मयत,२1 जखमी 

अशोक गवळी
बुधवार, 2 मे 2018

बोरगाव (जि.नाशिक)ः गुजरातकडून सप्तश्रृंगी गडाकडे येणाऱ्या खाजगी बस(टॅव्हल) गायधरी घाटात दरीत वीस फुट कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात तीन मयत झाले असून २1 जखमी झाले आहे. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.जखमीवर बोरगावच्या आरोग्य केंद’ात उपचार सुरु आहेत. काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास ही बस(जीजे-ए-४८५०) गुजरातहुन निघाली, बसमध्ये एकूण ५५ प’वासी होते. बस रात्री साडेतीनच्या दरम्यान हतगडजवळील गायधरी घाट चढत असतांना एका वळणाच्या ठिकाणी चालकांचा बसवरील ताबा सुटल्याने बस वीस फुट खोल दरीत कोसळली.सर्व प’वासी गाढ झोपेत असल्याने एकच गोंधळ उडाला.

बोरगाव (जि.नाशिक)ः गुजरातकडून सप्तश्रृंगी गडाकडे येणाऱ्या खाजगी बस(टॅव्हल) गायधरी घाटात दरीत वीस फुट कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात तीन मयत झाले असून २1 जखमी झाले आहे. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.जखमीवर बोरगावच्या आरोग्य केंद’ात उपचार सुरु आहेत. काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास ही बस(जीजे-ए-४८५०) गुजरातहुन निघाली, बसमध्ये एकूण ५५ प’वासी होते. बस रात्री साडेतीनच्या दरम्यान हतगडजवळील गायधरी घाट चढत असतांना एका वळणाच्या ठिकाणी चालकांचा बसवरील ताबा सुटल्याने बस वीस फुट खोल दरीत कोसळली.सर्व प’वासी गाढ झोपेत असल्याने एकच गोंधळ उडाला. कुणालाही काहीच समजत नव्हते, बस कोसळण्याचा आवाज झाल्याने जवळच पाड्यावरील राहणारे आदिवासी बांधव त्वरीत घाटाकडे धावले. रात्रीच्यावेळ असल्याने या भागात सामसुम होती, वाहनेही नव्हती, अखेर आदिवासी बांधवाच्या मदतीने हतगड गावात संपर्क साधून त्वरीत मदत मिळविण्यात आली. जखमींना दवाखान्यात हलविण्यात आले. तीनजणांचा जागीच मृत्यू झाला तर २0 जण गंभीर जखमी झाले. एकजण बसमध्ये अडकुन पडला आहे. अजूनही जखमींवर उपचार सुरु आहे. हे सर्व जण गुजरात व महाराष्ट’ातील आहे. 

Web Title: marath news gaydhari ghat apghat,3 dead