Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंतरवालीत मराठा समाजाची बैठक सुरू; वसंत मोरेंनीही लावली हजेरी

Lok Sabha Election 2024 : या बैठकीत राज्यातील 36 लोकसभा मतदासंघाचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्याचे वाचण व अभ्यास मनोज जरांगे करत आहेत.
Maratha community meeting Manoj Jarange Patil to decide Lok Sabha election 2024 candidacy  Vasant More joins Marathi News
Maratha community meeting Manoj Jarange Patil to decide Lok Sabha election 2024 candidacy Vasant More joins Marathi News

वडीगोद्री : लोकसभा निवडणूक व उमेदवारी या बाबत मराठा समाज बांधवाची बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मार्गदशनाखाली शनिवार (ता. 30) रोजी अंतरवाली सराटी येथे सकाळ पासुन सुरु झाली आहे. या ठिकाणी राज्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. (Vasant More Meet Manoj Jarange)

या बैठकीत राज्यातील 36 लोकसभा मतदासंघाचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्याचे वाचण व अभ्यास मनोज जरांगे करत आहेत. पुणे लोकसभा निवडणूककरिता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले असुन ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. वसंत मोरे हे जरांगे यांना पुणे लोकसभा मधुन आपल्याला उमेदवारी द्यावी करीता भेट घेणार आहे जरांगे यांच्या सोबत भेटल्यावर ते या बाबत माहिती देणार आहे.

Maratha community meeting Manoj Jarange Patil to decide Lok Sabha election 2024 candidacy  Vasant More joins Marathi News
Maharashtra Politics : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांची सून भाजपमध्ये, फडणवीसांनी २०१९च्या निवडणुकीत दिली होती तिकीटाची ऑफर...

आजच्या या बैठकीत निवडणूक लढवणे , उमेदवार ऊभे करणे, पुढील दिशा ठरवणे करीता चर्चा करण्यात येत आहे मराठा नेते ,माजी आमदार, कार्यकर्ते येथे दाखल झाले आहे. जरांगे यांनी सांगितल्या प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहे असे कार्यकर्ते आप आपल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले आहेत.

Maratha community meeting Manoj Jarange Patil to decide Lok Sabha election 2024 candidacy  Vasant More joins Marathi News
Kangana Ranaut: 'आपण लावलेला जावईशोध हा..'; सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत कंगानानं पोस्ट शेअर केल्यानंतर विश्वास पाटलांचं ट्वीट

36 जिल्ह्यातील अहवाल जरांगे यांना मिळाले आहे. या अहवालावर या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे, सर्वांना विचारात घेऊन कोणा कोणाला निवडणूकीमध्ये उभे करायचे या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. दिवसभर चर्चा केल्यानंतर सांयकाळी योग्य ती भूमिका, निर्णय जरांगे पाटील जाहीर करणार आहेत.

मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज - वसंत मोरे

पुणे लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे त्या करीता मी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आलो होतो आज त्यांना पुण्याचा अहवाल समाज बांधवांनी दिला. आज शनिवार ता.30 रोजी मनोज जरांगे यांची भेट झाली. पण चर्चा झाली नाही. कागदावर त्यांना माहिती दिली शुक्रवारी (ता.29 )वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे.

मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणुक लढवण्यावर ठाम आहे. मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे. आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील अशी अपेक्षा आहे माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार आहे असेही वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com